गुरूवार, 23 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 31 ऑक्टोबर 2021 (12:09 IST)

Accident in Uttarakhand: उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना : चकराता मध्ये वाहन दरीत कोसळले , 13 जणांचा मृत्यू, मदत आणि बचाव कार्य सुरू

Accident in Uttarakhand: Major accident in Uttarakhand: Vehicle crashes into valley in Chakrata
उत्तराखंडमधील चकराता येथे रविवारी भीषण अपघात झाला. चकराता येथील दुर्गम भाग असलेल्या तुनी रोडवर सकाळी 10 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. चकराता क्षेत्र डेहराडून जिल्ह्यात येतो .
 
वाहन खोल दरीत कोसळले 
चकराता कडे निघालेले वाहन विकासनगर गावाच्या पलीकडे रविवारी बायला-पिंगुवा मार्गावर बायला गावाचा पुढे चालकाचा गाडीवरून ताबा सुटल्याने खोल दरीत कोसळली.
 
मिळालेल्या माहितीनुसार या गाडीत 16 जण होते. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. 13 मृतांचे मृतदेह दरीतून  बाहेर काढण्यात आले आहेत.
 
स्थानिकांकडून मदत-बचाव कार्य सुरू आहे
पोलीस-प्रशासनाचे पथक घटनास्थळी हजर झाले असून स्थानिक लोकही मदतकार्यात गुंतले आहेत. माहिती मिळताच डेहराडून येथून एसडीआरएफ, जिल्हा पोलिस आणि अग्निशमन दलाचे बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले . एसपी ग्रामीण स्वतंत्र कुमार सिंह यांनी ही माहिती दिली आहे.
 
चकराता आणि तुनी तहसीलचे महसूल पथक चकराताकडे रवाना झाले. एसडीएम चकराता सौरभ अस्वाल यांनी सांगितले की, चकराता आणि तुनी तहसीलचे महसूल पथक अपघातासाठी घटनास्थळी पोहोचले आहे. डेहराडूनचे डीएम डॉ. आर राजेश कुमार यांनी सांगितले की, एसडीएम आणि एडीएम घटनास्थळी पोहोचले आहेत. डेहराडूनमधील डॉक्टरांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. वरील डॉक्टरांनी घटनास्थळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले  जाईल, असे डीएम म्हणाले. मृत आणि जखमींना आर्थिक मदत देण्याची शिफारस सरकारकडे करण्यात आली आहे.
 
सर्व मृतक एकाच गावातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच कॅबिनेट मंत्री गणेश जोशी आणि विरोधी पक्षनेते प्रीतम सिंह घटनास्थळी रवाना झाले आहेत.