शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (15:58 IST)

समृद्धी महामार्गावर तळेगाव येथे भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर तळेगाव येथे भीषण अपघात  झाला आहे. लोखंडी सळई घेऊन जात असलेला ट्रक पलटी होऊन अपघात झाला असून या दुर्घटनेत तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात काही मजूर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले आहे.
 
दुसरबीड येथून मजूर घेऊन समृद्धी महामार्गाच्या कामावर हे मजूर जात होते. त्यावेळी तळेगाव येथे हा अपघात झाला. समृद्धी महामार्गावर काम करणारे परप्रांतीय मजूर असल्याचे सांगण्यात येत आहे. एकूण ट्रकमध्ये 15 मजूर असल्याची प्राथमिक माहिती आहे.