तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू;
Tamil Nadu News : तामिळनाडूतील विरुधुनगर येथे फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहे. ही दुर्घटना विरुधुनगर जिल्ह्यातील सत्तूर भागात असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील सत्तूर भागात फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला. तसेच अग्निशमन आणि बचाव विभागाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. पुढील तपास सुरू आहे.कारखान्यातून आतापर्यंत 6 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहे. ही दुर्घटना विरुधुनगर जिल्ह्यातील सत्तूर भागात असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात घडली. मृतांमध्ये कारखान्यातील सहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच फॅक्टरीत चार खोल्या होत्या, ज्या स्फोटानंतर कोसळल्या. माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि काही जखमींना रुग्णालयात दाखल केले. स्फोट झाल्याचे कारण अजून समजू शकले नसून शॉर्ट सर्किटमुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.