1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Explosion at Sigachi Pharma company in Telangana 10 killed

तेलंगणाच्या सिगाची फार्मा कंपनीत स्फोट,10 जणांचा मृत्यू

तेलंगणाच्या संगारेड्डी येथे सिगाची नावाच्या केमिकल फॅक्टरीत स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण कारखान्याला वेढले असून परिसरात धुराचे लोट दिसत आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. 
तेलंगणाच्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी घटनेची पुष्टी केली आणि सांगितले की, संगारेड्डीतील मेडक येथील पास्मैलाराम फेज 1 येथील सिगाची फार्मा कंपनीतील एका रिअॅक्टरमध्ये स्फोट झाला. अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. सुमारे 15-20 लोक जखमी झाले आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमींपैकी काहींची प्रकृती खूपच गंभीर आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कारखान्यात आग लागल्याने बचावकार्य सुरू आहे. अपघाताचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.बचावकार्य सुरु आहे. 
Edited By - Priya Dixit
पुढील लेख
सुहागरात्री प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, साहिबा बानो बनली होती खुशी तिवारी