शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

एफ- 16 लढाऊ विमान आता मेड इन इंडिया

अमेरिकेतील एफ- 16 लढाऊ विमान आता भारतात तयार होणार आहे. एफ- 16 विमानाची निर्मिती करणार्‍या लॉकहिड मार्टिन कंपनीने टाटासोबत करार केला आहे. पॅरिसमधील एअर शो दरम्यान हा करार झाल्याचे सूत्रांकडून समजते.
 
एफ- 16 विमानाची निर्मिती करणार्‍या लॉकहिड मार्टिन कंपनीने भारताला विमान विकण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशांतर्गत विमान बांधणी क्षेत्राच्या विकासासाठी लढाऊ विमानांची निर्मिती भारताला व्हावी, असे वाटते. मोदी सरकारने तशी अटही कंपनीसमोर ठेवली होती.