गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 29 एप्रिल 2024 (10:06 IST)

छत्तीसगड मध्ये भीषण अपघात, 9 लोकांचा मृत्यू, 6 गंभीर जखमी

छत्तीसगड मध्ये बेमेतरा मध्ये भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये 9 लोकांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच 23 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहे. जखमींमध्ये 6 जणांची अवस्था गंभीर आहे. मृतांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगड मधील बेमेतरा मधील काठिया गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 23 जणांनपेक्षा अधिक लोक जखमी असल्याची माहित समोर आली आहे. 
 
जखमींमध्ये 6 लोक गंभीर जखमी असून त्यांना रायपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाकी इतर लोकांवर उपचार बेमेतरा आणि सीमगाच्या सीएचसी रुग्णालयात सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार पॅसेंजर्सने भरलेली ही पिकअप व्हॅन रस्त्यावर उभ्या असणाऱ्या एक टाटा 407 वर जोऱ्यात आदळली. ही टक्कर एवढी भीषण होती की, पिकअप व्हॅन पूर्णपणे टाटा 407 मध्ये घुसली. तसेच या भीषण अपघातात 9 लोकांचा जागीच मृत्यू झाला. या गाडीमध्ये 40 ते 50 लोक प्रवास करीत होते 
 
मिळालेल्या माहितीनुसार या गाडीतील सर्व लोक सामधीन भेट कार्यक्रम आटपून तिरैया गावावरून निघाले होते. तसेच काठिया गावाच्या रस्त्यावर उभी असलेली टाटा 407 वर या प्रवाशांनी भरलेली गाडी जोरदार येऊन आदळली. या घटनेमध्ये चार लहान मुलांसोबत 5 महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार दीपेश साहू वेळेवर  लगेच पोहचले.  

Edited By- Dhanashri Naik