नशेत जन्मदाते वडीलच बनले राक्षस, १३ वर्षांच्या मुलाचे फोडले डोळे
Madhya Pradesh News: मध्य प्रदेशात एका वडिलांनी आपल्या मुलावर केलेल्या क्रूरतेचा प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या लहान मुलाने वडिलांना दारू घेण्यापासून रोखले तेव्हा वडिलांनी आपल्या दोन्ही बोटे मुलाच्या डोळ्यात घातले. मध्य प्रदेशमधील भिंड शहरातील जुनी वस्ती परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली. मुलाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्याच्या डोळ्यांची स्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयातून ग्वाल्हेरला रेफर केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. वडिलांनी डोळ्यात बोटे घातल्यानंतर अल्पवयीन मुलाचे डोळे रक्ताळले. डोळ्यांची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर कुटुंबातील सदस्यांनी जखमी अल्पवयीन मुलाला उपचारासाठी रुग्णालयात नेले. मुलाच्या डोळ्यांवर ग्वाल्हेरमध्ये उपचार सुरू आहे.
Edited By- Dhanashri Naik