1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (23:34 IST)

अपघातातील एकमेव बचावलेल्या ग्रुप कॅप्टन वरुण सिंगची प्रकृती कशी आहे, जाणून घ्या

Find out the condition of the only surviving group Captain Varun Singh अपघातातील एकमेव बचावलेल्या ग्रुप कॅप्टन वरुण सिंगची प्रकृती कशी आहे
भारतीय हवाई दलाने मंगळवारी तामिळनाडूमध्ये 8 डिसेंबर रोजी झालेल्या भीषण हेलिकॉप्टर अपघातातील एकमेव बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्या प्रकृतीबाबत ताजी माहिती शेअर केली. सिंग यांची प्रकृती चिंताजनक पण स्थिर असल्याचे हवाई दलाने सांगितले. वरुण सिंग यांच्यावर बेंगळुरू येथील कमांड हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असून ते लाइफ सपोर्ट सिस्टीमवर आहेत.  चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि इतर 11 लष्करी अधिकारी देशाच्या इतिहासातील सर्वात प्राणघातक अपघातांपैकी एका अपघातात ठार झाले. फक्त ग्रुप कॅप्टन वरुण सिंग बचावले पण ते गंभीर जखमी झाले. देशभरात त्यांच्या आयुष्यासाठी आणि   आरोग्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत.
शनिवारी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वरुण सिंग यांचे वडील कर्नल (निवृत्त) केपी सिंग यांच्याशी चर्चा केली. गुरुवारी त्यांना वेलिंग्टन येथील आर्मी हॉस्पिटलमधून बेंगळुरूच्या एअर फोर्स कमांड हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. ग्रूप कॅप्टन वरुण सिंग यांना नुकतेच राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले.