गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 12 मार्च 2023 (14:28 IST)

एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये सिगारेट ओढणाऱ्या आरोपीविरुद्ध एफआयआर

एअर इंडियाच्या विमानात सिगारेट ओढून आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाविरुद्ध मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. रमाकांत असे आरोपीचे नाव असून तो भारतीय-अमेरिकन आहे. 11 मार्च रोजी एअर इंडियाच्या लंडन-मुंबई विमानाच्या बाथरूममध्ये रमाकांतने सिगारेट ओढल्याचा आरोप आहे. यानंतर त्याने इतर प्रवाशांशीही गैरवर्तन केले. आरोपींनी फ्लाइटचा आपत्कालीन दरवाजाही उघडण्याचा प्रयत्न केला. क्रू मेंबर्सनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांनाही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याच्या बॅगेत काही औषधे असल्याचे त्याने क्रू मेंबर्सना सांगितले. तरी, पोलिस तपासात असे काहीही आढळून आले नाही. मुंबई पोलिसांनी सांगितले की, आरोपीचे नमुने प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यावरून तो नशेच्या अवस्थेत होता की मानसिक अस्वस्थता होता हे समजेल. 
 
Edited By - Priya Dixit