1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. FIR filed against Rishi Kapoor, contractor for tree-cutting

ऋषी कपूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मुंबई महापालिकेने ऋषी कपूर यांच्याविरोधात खार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. वांद्र्यातील पाली हिल्समध्ये असलेल्या कृष्णा राज बंगल्यातील वडाच्या झाडाच्या फांद्या परवानगीपेक्षा जास्त कापल्याने मुंबई महापालिकेने ऋषी कपूर यांना नोटीस पाठवली होती. त्यांनी चुकीच्या पद्धतीने वापर करुन झाडाच्या बळकट फांद्या कापल्या.

हा महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण तसंच जतन (सुधारणा) अधिनियम 155 अंतर्गत गुन्हा आहे. त्यामुळे ऋषी कपूर आणि कंत्राटदारांना नोटीस पाठवून उत्तर मागितलं होतं. यात तुमच्यावर कारवाई का करु नये, अशी विचारणा करत ऋषी कपूर यांना उत्तर देण्यासाठी 24 तासांची मुदत देण्यात आली होती. पण कोणतंही उत्तर न आल्याने ऋषी कपूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील लेख
IRCTC द्वारे आज बुक करा रेल्वे तिकिट आणि पेमेंट करा 14 दिवसांनी...!