संबंधित माहिती
- देशातील 31 राज्ये व केंद्रशासित प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा
- हवामान खात्याचा देशातील 18 राज्यांमध्ये येलो अलर्ट
- जम्मू-काश्मीर येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 3 दहशतवादी ठार
- भाजपची जम्मू-काश्मीरमधील उमेदवारांची पहिली सुधारित यादी जाहीर, 15 नवीन उमेदवारांचा समावेश
- अजित पवारांची राष्ट्रवादी जम्मू-काश्मीरमध्ये भाजपविरोधात निवडणूक लढवणार,उमेदवारांची नावे जाहीर
सुंजवान आर्मी कॅम्पवर गोळीबार,एक जवान जखमी
जम्मुतील सुंजवान आर्मी कॅम्प जवळ सुरक्षा दलांनी दहशतविरोधी कारवाई सुरु केली असून लष्कराने तातडीने कारवाई करत गोळीबार सुरु केला आणि परिसराची नाकेबंदी सुरु केली.या गोळीबारात एक जवान जखमी झाला आहे. शोध मोहीम सुरु आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतरी शहराच्या बाहेरच्या भागात सुंजवान चौकी जवळ काही संशयास्पद लोकांची हालचाल दिसली नंतर लष्कराने कारवाई करत गोळीबार सुरु केला. या गोळीबारात कोणी जखमी झाले नाही. परिसरात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
घटनास्थळी जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दल पोहोचले या मध्ये एक जवान जखमी झाला आहे.
प्रशासनाने स्थानिक रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती त्वरित सुरक्षा दलांना द्यावी.असे सांगण्यात आले आहे.शोध मोहीम सुरु आहे.
Edited by - Priya Dixit