शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 27 जानेवारी 2018 (15:50 IST)

देशातील पहिले एसी मिल्क सेंटर तर राज्यातील पहिले दुधाचे एटीएम

होय आपण सर्वांनी पैसे काढण्याचे एटीएम पाहिले आहे. मात्र यापुढे जात आता नाशिकमध्ये एक नवीन प्रकारचे एटीएम चर्चेत आहे. त्यातही ते रुपये काढण्याचे  म्हणजे ऑटोमिक टेलर मशिन नाही तर  तर एनी टाईम मिल्क (ATM) मशीन आहे. महाराष्ट्रातील या पहिल्या दुधाच्या एटीएमचे
उद्घाटन  प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत झाले. पालकमंत्री गिरीश महाजन आणि लोकप्रतिनिधींच्या हस्ते या एटीएमचं लोकार्पण झाल आहे. हे एटीएम पूर्ण राज्यात चर्चेचा विषय झाले आहे.

 
या पंचताराकित एटीएम ची राज्यात प्रथमच सिन्नर तालुका दूध संघाने सुरवात केली असून, सहकार तत्वावरील हा मोठा प्रयोग असून, या मार्गात ते मको हा ब्रांड बाजारात उतरवणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारची सर्व अन्न पदार्थावरील नियमांची कडेकोट पालन करण्यात येणार आहे. या बाबतची माहिती सिन्नर तालुका दूध संघाचे चेअरमन माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. 
 
नाशिक तालुक्यातील सिन्नर तालुका दूध उत्पादक संघाकडून लष्कराला नियमित दुध पुरवठा होत. दुधात थोडी जरी भेसळ असेल तर लष्कर ते घेत नाहीत. त्यामुळे लष्कराने या दुधावर विश्वास दाखवला आहे. असेच योग आणि आरोग्यदायी दुध नाशिकच्या नागरिकांना उपलब्ध करवून देण्यात येत आहे असे माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले आहे. देशात दिल्ली आणि गुजराथ तर दक्षिण भारतात दुधाचे २४ तास असे एटीएम आहेत. मात्र फक्त मशीन आहेत मात्र आम्ही पूर्ण हायजेनिक आणि पूर्ण एसी असे दालन तयार केले आहे. अमूल प्रमाणे मको हा ब्रॅड असणार असून यामुळे शेतकरी वर्गाला चांगला नफा मिळणार आहे.
 
नाशिक तालुक्यातील सिन्नर तालुका दूध उत्पादक संघ हा प्रगत असून, त्यांच्या वतीने राज्यातील पहिलं एनी टाईम मिल्क ही संकल्पना अमलात आली आहे. या वातानुकूलित एटीएममध्ये ग्राहकाच्या मागणीनुसार कार्ड मशीनमध्ये टाकल्यानंतर 10 रुपयांपासून पाच-दहा लिटर दूध मिळू शकणार आहे. तर याच ठिकाणी लगेच दूध तपासून त्यातील फॅट्स आणि अन्य घटक मोफत तापाणीची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे, अशी माहिती दूध संघाचे प्रमुख आणि माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. या एटीएम मध्ये २४ तास दुध मिळणार असून यामध्ये गिर गाई पेक्षा उत्तम वरचढ अश्या  सायवाल गायीचे दूध देखील उपलब्ध आहे. सायवाल दुध 80 रुपयाने ते देण्यात येणार आहे. तर ग्राहकांना  शेतकऱ्याच्या गोठ्यातील प्रक्रिया न करता थेट दूध देण्याची व्यवस्था आहे. ज्या ग्राहकांना थेट गोठे बघायचे त्यांना ते देखील दाखविले जाणार आहे. या एटीएम मशीनसाठी सुमारे 5 लाख रुपये खर्च आला आहे.नाशिक शहरातील या पहिल्या एटीएमनंतर मुंबईसह 50 एटीएम सुरू केली जाणार आहेत. या प्रकल्पासाठी शेअर विक्रीसाठी उपलब्ध असून त्यातून 5 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येणार आहे. यामध्ये शेअर धारकांना स्वस्तात दूध तसेच लाभांश देखील मिळणार आहे. दूध विक्रीबरोबरच दुग्धजन्य पदार्थ आणि मिठाई देखील तयार करणार असून, सिन्नर-घोटी मार्गावर 10 एकर जागेत काम सुरू आहे. मार्च महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे, असेही कोकाटे यांनी सांगितले आहे.