गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 11 डिसेंबर 2023 (17:10 IST)

आधी स्वतःला वाहिली श्रद्धांजली, नंतर तरुणाने केली आत्महत्या

suicide
सध्या सगळे जण सोशल मीडियावर सक्रिय आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी सोशल मीडियावर काही न काही शेअर करतात. पण अनेकदा या प्लॅटफॉर्मवर अशा काही पोस्ट असतात जे खूप धक्कादायक असतात. केरळच्या अलुवातील एका इन्फ्ल्यूएंसरने प्रसिद्धी मिळवण्यासाठी इंस्टाग्रामवर स्वतःच्या निधनाची बातमी ठेऊन फोटो शेअर केला नंतर त्याने  गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अजमल शरीफ असे या तरुणाचे नाव असून तो 28 वर्षाचा होता.
 
त्याने आत्महत्या करण्यापूर्वी इंस्टाग्रामवर स्वतःला श्रद्धांजली देऊन निधनाची बातमी टाकली होती. संध्याकाळी 6:30 च्या सुमारास त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अजमलचा मृतदेह घराच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला नौकरी नसल्याने तो खूप नैराश्यात होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदासाठी पाठविले नंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिले. अजमल हा एक इन्फ्ल्यूएंसर असून त्याचे 15 हजाराहून अधिक फॉलोअर्स होते.   

त्याने आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःसाठी एक शोकसंदेश पोस्ट करून कॅप्शन मध्ये त्याने कळवताना अत्यंत दुःख होत आहे की अजमल शरीफचं  निधन झालं आहे. RIP अजमल शरीफ 1995 - 2023  त्याच्या आत्म्याला शांती लाभो' असे  लिहून पोस्ट टाकले आहे.अजमलचे हे पोस्ट पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याने असं टोकाचं पाऊल का घेतले यावर प्रश्न उद्भवत आहे. 
 
  
Edited by - Priya Dixit