शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: हैदराबाद , सोमवार, 23 डिसेंबर 2019 (16:00 IST)

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात घराबाहेर तिरंगा फडकवा : ओवेसी

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात असलेल्या लोकांनी आपापल्या घराबाहेर तिरंगा फडकवावा, असे आवाहन एमआयएचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले. हैदराबादमध्ये आोजित केलेल्या एका सभेत ते बोलत होते. 
 
हैदराबादमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान  केलेल्या भाषणात ओवेसी यांनी मोदी सरकारवर टीका केली.
 
जे लोक या कायद्याविरोधात आहेत त्यांनी आपआपल्या घराबाहेर तिरंगा फडकवून त्याचा विरोध करावा. ज्यामुळे सरकार करत असलेले हे कायदे चुकीचे असल्याचा संदेश भाजपपर्यंत पोहोचेल, असे ओवेसी म्हणाले. 
 
ओवेसी यांनी यावेळी आंदोलकांना अहिसेंच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहनदेखील केले. या आंदोलनांदरम्यान कोणी तुम्हाला त्रास दिला तर तुम्ही हिंसा करू नका. आंदोलनादरम्यान हिंसा झाल्यास  आपली बाजू चुकीची ठरेल. आपल्याला हा लढा पुढचे सहा महिने सुरू ठेवायचा आहे. त्यामुळे शांततेत हे सगळे पार पाडले पाहिजे. आपल्याला या कायद्याविरोधात लोकशाही मार्गाने लढा उभाराचा आहे, असे ते म्हणाले. या सभेला उपस्थित नागरिकांसमोर संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करत 'संविधान बचाओ दिवस' साजरा करणसही सांगितले.