गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :जयपूर , मंगळवार, 14 मार्च 2023 (11:06 IST)

करणी सेनेच्या संस्थापकांचे निधन

lokendrasingh kalvi
राजपूत करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी यांचे जयपूरमध्ये निधन झाले. राजपूत करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंग कालवी यांचे काल रात्री जयपूरमधील सवाई मान सिंग (एसएमएस) रुग्णालयात निधन झाले, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
  
लोकेंद्र सिंग कालवी यांना ब्रेन स्ट्रोकचा त्रास होता
लोकेंद्र सिंह कालवी यांना ब्रेन स्ट्रोकचा त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे. एसएमएस रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अचल शर्मा यांनी सांगितले की, सवाई मान सिंग (एसएमएस) रुग्णालयात जून 2022 पासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
आज अंत्यसंस्कार होणार आहेत
लोकेंद्र सिंह कालवी यांच्या पार्थिवावर आज नागौर जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
 
वडील माजी केंद्रीय मंत्री होते
लोकेंद्र सिंह कालवी हे माजी केंद्रीय मंत्री कल्याण सिंह कालवी यांचे पुत्र होते. कल्याणसिंग कालवी हे चंद्रशेखर यांचे जवळचे विश्वासू होते आणि व्हीपी सिंग सरकारच्या पतनानंतर चंद्रशेखर यांच्या सरकारच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. 1991 मध्ये ते कॅबिनेट मंत्री बनले आणि ऊर्जा खात्याची जबाबदारी सांभाळली.
Edited by : Smita Joshi