रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 12 मार्च 2023 (17:32 IST)

काश्मीर: बडगाममध्ये श्रद्धा हत्येसारखी घटना, मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी फेकले

murder
मध्य काश्मीरमधील बडगाममध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका महिलेची हत्या करून तिच्या मृतदेहाचे वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याप्रकरणी पोलिसांनी येथे एका व्यक्तीला अटक केली आहे.
 
 महिला ग्रॅज्युएशन करत होती. 7 मार्चपासून ती बेपत्ता होती. महिलेच्या कॉल डिटेल्सच्या आधारे पोलिसांनी 8मार्च रोजी शब्बीर अहमदला ताब्यात घेतले. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने शनिवारी गुन्ह्याची कबुली दिली. 45 वर्षीय आरोपी शब्बीर विवाहित असून तो बडगाम जिल्ह्यातील ओमपोरा भागातील रहिवासी आहे. तो सुताराचे काम करतो. हत्येमागचे कारण पोलीस अद्याप उघड करू शकले नसले तरी, महिलेच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की त्या व्यक्तीने आधी लग्नासाठी तिच्या कुटुंबाशी संपर्क साधला होता, परंतु महिलेने त्याचा प्रस्ताव नाकारला होता. 
 
 
ही महिला गेल्या चार दिवसांपासून घरातून बेपत्ता होती. आरोपीने खुलासा केला की त्याने महिलेची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ओमपोरा आणि सेबडेन रेल्वे ब्रिजसह वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. शनिवारी रात्री पोलिसांनी पीडितेचे डोके आणि शरीराचे इतर अवयव जप्त केले. याप्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. दुसरीकडे, महिलेच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, आरोपी अहमद हा टाईल्सच्या कामासाठी तिच्या घरी आला होता.
 
Edited By - Priya Dixit