शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 15 फेब्रुवारी 2023 (17:20 IST)

कावेरी नदीत बुडून चार विद्यार्थिनींचा मृत्यू

तामिळनाडूच्या करूर जिल्ह्यात बुधवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथे करूर जिल्ह्यातील मयूर येथे चार विद्यार्थिनी कावेरी नदीत बुडाल्या. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. करूर पोलिसांनी अपघाताला दुजोरा दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या विद्यार्थिनी पुदुकोट्टई जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सर्व शासकीय माध्यमिक शाळेत शिकत होत्या.
 
फुटबॉल स्पर्धेत भाग घेण्यासाठी मुली आल्या होत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुदुकोट्टई जिल्ह्यातील विरलीमलाई येथील सरकारी माध्यमिक शाळेचा फुटबॉल संघ एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्रिची येथे गेला होता. या विद्यार्थिनींनी स्पर्धेत भाग घेतला आणि बुधवारी मयूर येथे सहलीला गेले. तेव्हाच एक विद्यार्थिनी कावेरी नदीत उतरली. ती बुडू लागली. तिचा आरडाओरडा ऐकून इतर विद्यार्थिनींनी तिला वाचवण्यासाठी धाव घेतली. चार विद्यार्थिनी एकामागून एक बुडाल्या. माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन विद्यार्थिनींचे मृतदेह नदीतून बाहेर काढले.
 
तमिलरासी, सोभिया, इनिया आणि लावन्या अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. कुटुंबीयांनाही माहिती देण्यात आली आहे.