शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 27 ऑगस्ट 2024 (16:29 IST)

सर्वोच्च न्यायालयाकडून के. कविता यांना जामीन मंजूर

दिल्लीतील दारू घोटाळा प्रकरणात बीआरएस नेते आणि आमदार के कविता यांच्या जामीन  याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने एएसजीला पुरावे नष्ट केल्याचे सिद्ध करण्यास सांगितले. तपास पूर्ण झाला असून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 

सुनावणी दरम्यान अधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला की, के कविता सध्या आमदार आहे. सीबीआय आणि ईडी प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने तपास यंत्रणा ईडी आणि सीबीआय यांना कविताच्या घोटाळ्यातील कथित सहभागाचे कोणते पुरावे आहेत आणि ते पुरावे न्यायालयाला दाखवण्यास सांगितले. 

सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाचा तो आदेश फेटाळला ज्यात के . कविता यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने के. कविता यांना दोन्ही प्रकरणांमध्ये प्रत्येकी 10 लाख रुपयांच्या जामीनपत्रावर, साक्षीदारांशी छेडछाड न करणे आणि साक्षीदारांवर प्रभाव न ठेवण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर यांची मुलगी आणि बीआरएसचे एमएलसी कविता 15 मार्चपासून पोलिसांच्या ताब्यात आहे. 
Edited by - Priya Dixit