गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

गांधी कुटुंबाचे एसपीजी सुरक्षा कवच काढणार

Gandhi family will remove SPG security armor
गांधी कुटुंबाचे एसपीजी सुरक्षा कवच म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप काढण्याचा निर्णय सरकारने निर्णय घेतला आहे. यापुढे  काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांची दोन मुले राहुल, प्रियंका गांधी वड्रा यांना आता झेड प्लस कॅटेगरीची सुरक्षा असेल.
 
नुकताच सुरक्षेसंदर्भातील आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. एसपीजी ही पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा संभाळणारी पहिली एलिट फोर्स आहे. यामध्ये ३००० अधिकारी आहेत. एसपीजीकडे आता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेची जबाबदारी असेल. झेड प्लसमध्ये गांधी कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय राखीव पोलीस दलाकडे (सीआरपीएफ) असेल.
 
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची १९९१ साली हत्या झाली. तेव्हापासून गांधी कुटुंबाला एसपीजीचे सुरक्षा कवच आहे. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबाला १० वर्षापर्यंत सुरक्षा देण्यासाठी एसपीजी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली.