गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 3 नोव्हेंबर 2016 (17:07 IST)

पोलिसांच्या प्रश्नांनी अपमानित होऊन महिलेने केस मागे घेण्याचा निर्णय, नवर्‍याच्या मित्रांनी केला होता गँगरेप

पीडित महिलेने टिप्पणी केली, "बरे झाले की सौम्या आणि जिशा मेल्या नाहीतर त्यांना देखील याच प्रकारच्या अपमानजनक प्रश्नांचे उत्तर द्यावे लागले असते."
 
केरळमध्ये गँगरॅप पीडित एका महिलेला पोलिसांनी असे असे प्रश्न विचारले की तिने केस मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिलेसोबत तिच्या नवर्‍याच्या मित्रांनी सामूहिक बलात्कार केला होता. पीडित महिलेने आरोप लावला आहे की पोलिसांना आरोपींची मदत करायची आहे. म्हणून अपमानजनक आणि त्रास देणारे प्रश्न विचारण्यात आले. पीडितानुसार पोलिसांनी तिला विचारले की रॅप करणार्‍यांमधून सर्वात जास्त आनंद कोणासोबत आला. हा खुलासा डबिंग आर्टिस्ट भाग्यलक्ष्मीच्या एका फेसबुक पोस्टच्या माध्यमाने झाला. फेसबुकवर हा  पोस्ट वायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री पी विजयनच्या ऑफिसने प्रकरणाबद्दल सज्ञान घेतले आहे आणि कारवाईचे आश्वासन दिले आहे. पीडित महिला आणि तिच्या नवर्‍याचा चेहरा झाकलेला एक फोटो गुरुवारी फेसबुकवर वायरल झाला आहे. पोस्टमध्ये 35 वर्षाची पीडिताने म्हटले,  “मला कुठलीही केस लढाईची नाही आहे कारण पोलिस आम्हाला जाणूनबुझून त्रास देत आहे. हे रॅपपेक्षाही जास्त दुखदेणारी बाब आहे. पोलिस आम्हाला धमकी देत असून आमचा अपमान करत आहे.” भाग्यलक्ष्मीने आपल्या पोस्टामध्ये लिहिले आहे की जेव्हा ती पीडित महिलेच्या नवर्‍यासोबत तिला भेटायला गेली तेव्हा तिचे अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते.  
 
महत्त्वाचे म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीत तिरुवनंतपुरमहून किमान 280 किलोमीटर दूर त्रिशूरच्या एका गावात एका महिलेने आरोप लावला होता की तिच्या नवर्‍याच्या चार मित्रांनी तिच्यासोबत सामूहिक बलात्कार केला आहे. फेसबुक पोस्टामध्ये महिलेचा आरोप आहे की जेव्हा तिचा नवरा घरी नव्हता तेव्हा हे चारी लोक तिच्या घरी आले आणि म्हणाले तुझा नवरा दवाखान्यात आहे. महिलेने त्यांच्यावर भरवसा केला आणि त्यांच्यासोबत दवाखान्यासाठी निघाली पण त्यांनी गाडीला दुसरीकडे वळवले. फेसबुक पोस्टमध्ये भाग्यलक्ष्मीने लिहिले आहे,  “त्यानंतर ते लोक महिलेला शहराच्या बाहेर घेऊन गेले आणि पाळी पाळीने सर्वांनी तिच्यासोबत रॅप केला. त्यातून एक राजनैतिक पक्षाचा मोठा पदवीधरी आहे.”
 
भिती आणि पीडेमुळे पीडित महिलेने आपल्या नवर्‍याला या बद्दल किमान तीन महिन्यानंतर ऑगस्टमध्ये सांगितले. नवर्‍याच्या म्हणण्यावरून जेव्हा पीडिताने पोलिसामध्ये तक्रार नोंदवली तेव्हा पोलिसाने चारी आरोपींना ठाण्यात बोलावले आणि त्यांच्यासमोर   महिलेला अपमानजनक प्रश्न विचारले. पीडित महिलेला जेव्हा वाटले की तिने तक्रार नोंदवण्यात उशीर केला आहे तेव्हा त्याचा फायदा घेऊन पोलिस तिला शर्मसार करत आहे, तेव्हा तिने केस मागे घेण्याचा निर्णय घेतला. भाग्यलक्ष्मीने आपल्या पोस्टामध्ये लिहिले आहे की पीडित महिलेने टिप्पणी केली, “"बरे झाले की सौम्या आणि जिशा मेल्या नाहीतर त्यांना देखील याच प्रकारचे अपमानजनक प्रश्नांचे उत्तर द्यावे लागले असते."