बुधवार, 16 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 16 एप्रिल 2023 (00:02 IST)

गँगस्टर अतिक आणि अशरफ यांची सार्वजनिक ठिकाणी गोळ्या झाडून हत्या, पोलिसांनी तिघांना अटक केली

गँगस्टरअतिक अहमद आणि अशरफ यांची प्रयागराजमधील केल्विन हॉस्पिटलमध्ये तपासणीदरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दोघांनाही पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. पोलिस त्याची चौकशी करत होते. दरम्यान, मेडिकल कॉलेजजवळ दोघांची हत्या करण्यात आली. दोघांच्या मृतदेहाजवळ एक पिस्तूल पडलेले आहे. अलीकडेच उमेश पाल खून प्रकरणात अतिक अहमदला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

अतिक आणि अशरफवर गोळ्या झाडणाऱ्यांची ओळख उघड झाली आहे. लवलेश तिवारी, सनी आणि अरुण मौर्य अशी ही घटना घडवणाऱ्यांची नावे असल्याचं सांगण्यात येत आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिक आणि अशरफ यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेची अधिक माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. घटनेनंतर लगेचच अतिक अहमद आणि अशरफ यांचे मारेकरी पोलिसांनी पकडले. जमिनीवर पडल्यानंतर हल्लेखोरही पकडले गेल्याचे सांगण्यात आले.
 
Edited By - Priya Dixit