मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 15 एप्रिल 2023 (19:51 IST)

Bihar: मोतिहारीमध्ये विषारी दारूमुळे 16 जणांचा मृत्यू

बिहारमध्ये पुन्हा एकदा विषारी दारू पिऊन 16 जणांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला 5 जणांचा मृत्यू झाला होता तर दुपारपर्यंत आणखी एकाचा मृत्यू झाला होता. 10 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. आता सर्व 16 जणांच्या मृत्यूचीबातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, "ही दुःखद घटना आहे, मी या प्रकरणी संपूर्ण माहिती मागवली आहे. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. 
 
मोतिहारी जिल्ह्यातील लक्ष्मीपूर गावात विषारी दारूचा कहर पाहायला मिळाला. दारू प्यायल्याने 6 जणांचा मृत्यू झाला होता तर 10 जणांची प्रकृती गंभीर झाली होती. या घटनेबाबत एफएसएल आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथके तपासासाठी तैनात करण्यात आली आहेत.
 
Edited By - Priya Dixit