बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 1 मे 2024 (12:42 IST)

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

बिहार : बिहार मधील किशनगंज जिल्ह्यातील पौआखाली मध्ये जेवण बनवतांना गॅस सिलेंडर लीक झाल्याने आग लागली व यामध्ये एक महिला आणि तिचे चार मुले यांचा मृत्यू झाला आहे. 
 
बिहारमधील किशनगंज जिल्ह्यामध्ये एक भयंकर घटना घडली आहे. किशनगंज जिल्ह्यातील पौआखाली मध्ये जेवण बनवता असताना अचानक सिलेंडर लीक झाले व यामध्ये आग लागली ही आग एवढी भीषण होती की, यामध्ये एक महिला आणि तिचे तीन लहान मुलं यांचा मृत्यू झाला आहे. तसेच या आगीमध्ये दोन लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेची पोलीस चौकशी करीत आहे या भीषण घटनेमुळे संपूर्ण परिसर शांत झाला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी ही महिला जेवण बनवत होती. तेव्हा अचानक स्वयंपाक घरात सिलेंडर लीक झाले काही कळायच्या आत सिलेंडरने पेट घेतला. ही आग एवढी भीषण होती की, सर्व सदस्य जखमी झाले व जेवण बनवत असलेली महिला व तिच्याजवळ असलेले तीन मुलं यांच्या मृत्यू झाला. 

Edited By- Dhanashri Naik