शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 जून 2023 (14:35 IST)

Ghaziabad: धावत्या बाईकवर कपलचा रोमान्स, व्हिडीओ व्हायरल

social media
सध्या सोशल मीडियावर दुचाकीवर बसून रोमान्स करण्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर जोडप्याच्या अश्लील कृत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मंगळवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या तरुण आणि महिलेने अश्लील कृत्य केले. कार चालवणाऱ्या एका तरुणाने त्याचा व्हिडिओ बनवला. या प्रकरणी कारवाई करताना गाझियाबाद वाहतूक पोलिसांनी 21,000 रुपयांचा दंड आकारला आहे. 

बुधवारी सकाळी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ इंदिरापुरम कोतवाली भागातील दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेचा असल्याचा दावा करण्यात आला होता. व्हिडिओमध्ये तरुण दुचाकी चालवत असल्याचे दिसत आहे. टाकीवर बसलेली मुलगी त्याला मिठी मारत आहे. त्याने हेल्मेटही घातलेले नाही.
ट्विटरवर व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्स दुचाकीस्वारावर कारवाई करण्याची मागणी करत होते. यूपी पोलिसांच्या ट्विटर हँडलवरून याची दखल घेत गाझियाबाद वाहतूक पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. गाझियाबाद ट्रॅफिक पोलिसांनी या दुचाकीचालकाला दंड ठोठावले आहे. 
 
हेल्मेट न घातल्याबद्दल 1000 रुपये, सदोष नंबर प्लेटसाठी 5,000 रुपये, वायू प्रदूषणासाठी 10,000 रुपये आणि वेगाने चालवल्याबद्दल 5,000 रुपये असे एकूण 21 हजार रुपयांचे दंड बजावले आहे. 
 


Edited by - Priya Dixit