बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

बाबा रामपालची दोन प्रकरणात सुटका

सतलोक आश्रमाचा संचालक बाबा रामपालची हरियाणा न्‍यायालयाने दोन प्रकरणात सुटका केली आहे. मात्र, इतर खटले सुरुच राहणार असल्‍याचे म्‍हटले आहे. त्यामुळे रामपाल यांची तुरुंगातून मुक्तता होणार नाही. देशद्रोह आणि हत्येचा खटला त्यांच्यावर सुरु राहणार आहे. रामपाल हिस्‍सारच्‍या सेंट्रल जेल क्रमांक १ मध्‍ये होता. व्‍हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्‍या माध्‍यमातून न्‍यायालयाची कार्यवाही सुरु होती. सरकारी कार्यात अडथळे आणणे आणि जबरदस्‍तीने लोकांना बंधक बनवल्याचा आरोप रामपालवर आहे. या दोन्‍ही प्रकरणांमध्‍ये प्रीतम सिंह, राजेंद्र, रामफल, वीरेंद्र, पुरुषोत्तम, बलजीत, राजकपूर ढाका, राजकपूर आणि राजेंद्र यांना आरोपी ठरवण्‍यात आले आहे. 
 
सतलोक आश्रमात नरबळीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने रामपालच्‍या अटकेचेही आदेश दिले होते. मात्र, अटकेवेळी रामपालच्‍या समर्थकांनी विरोध केला होता. त्यानंतर पोलिस आणि समर्थकांमध्येही चकमकही झाली होती. या घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. अखेर पोलिसांनी रामपालला नोव्हेंबर २०१४ मध्ये अटक झाली. आश्रमात थेट रुग्‍णवाहिकाच नेऊन पोलिसांनी रामपालला रुग्‍णवाहिकेतून नेले होते. या वेळी रामपालच्या समर्थकांनी पोलिसांवर गोळीबार देखील केला होता.