चांगली बातमी! जनधन खातेधारकांना 1.3 लाख रुपयांचा फायदा
जनधन खात उघडण्याचा विचार करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारतर्फे आनंदाची बातमी आहे, या खातंधारकांना केंद्र सरकार कडून 1 30 लाख रुपयांचा फायदा मिळणार आहे.या पंतप्रधान जनधन योजने अंतर्गत ग्राहकांना अनेक प्रकारचं आर्थिक साहाय्य मिळत.याशिवाय खातंधारकांना 1.30 लाखापर्यंत लाभ मिळण्यासह 1,00,000 रुपयांचा अपघात विमा आणि 30,000 रुपयांचा जनरल विमा देखील मिळतो.खातेधारकांचा अपघात झाल्यावर 30,000 रुपये दिले जातात.आणि खातेदार मृत्युमुखी झाल्यास कुटुंबियांना एक लाख रुपये देण्यात येतात.एकूण खातेधारकाला 1.30 लाख रुपयांचा फायदा मिळतो.
भारतातील कोणीही नागरिक या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतो.त्याला या साठी खातं उघडावे लागणार.या साठीची वयोमर्यादा कमीत कमी 10 वर्ष आहे.10 वर्षावरील कोणीही भारतीय नागरिक या योजने अंतर्गत कोणत्याही बँकेच्या शाखेत खातं उघडू शकतं.या साठी जवळच्या बँकेत जाऊन जनधन अकाउंट उघडण्याचा फॉर्म भरा.फॉर्म मध्ये विचारण्यात आलेली आवश्यक माहिती द्या.जसे की अर्जदाराचे नाव,मोबाईल नंबर,बॅंक ब्रांच नाव, पत्ता, नॉमिनी नाव,व्यवसाय,रोजगार,वार्षिक उत्पन्न,घरातील सदस्य,एसएसए कोड,वार्ड क्रमांक,गावाचा कोड ही माहिती द्यावी लागते.
आपण पंतप्रधान जनधन योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन देखील अधिक माहिती मिळवू शकता.भारताची रहिवाशी ज्याचं 10 वर्षापेक्षा जास्त आहे तो हे जनधन खातं उघडू शकतं.