1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Grenade attacks 6 terrorists in Kashmir Valley

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून ग्रेनेड फेकत 6 हल्ले

Grenade attack

काश्मीर खोऱ्यात मंगळवारी रात्री दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकत 6 हल्ले केले. यामध्ये एका सीआरपीएफच्या अधिकाऱ्यासह 13 जवान जखमी झाले. दहशतवाद्यांच्या शोधासाठी  काश्मीर खोऱ्यात मोहीम सुरु आहे. जम्मू-काश्मीरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी संध्याकाळी साडे सहा ते रात्री साडे अकरापर्यंत दहशतवाद्यांनी सीआरपीएफ, जम्मू-काश्मीर पोलिस आणि लष्कराच्या सहा ठिकाणांना निशाणा बनवलं. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल, पडगामपोरा, पहलगाममधील सरनाल, सोपोरमधील पाजलपुरा आणि अनंतनागमधील सुरक्षरक्षक आणि लष्कराच्या ठिकाणांवर दहशतवाद्यांनी हल्ले केले. या घटनेनंतर काश्मीर खोऱ्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

पुढील लेख
करदात्यांना आयकर भरण्यासाठी यूझर फ्रेण्डली अॅप