बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

जलयुक्त शिवार अभियानाचे आणखी एक वर्ष

आज जसजसे आपण पुढे जातोय तसे मानवाच्या आरोग्यासोबत जमिनीचे आरोग्य धोक्यात आलेय, अत‍िरिक्त रसायन वापर व घसरत्या जमिनीचा पोत यामुळे एके काळीच्या `सुजलाम सुफलाम ' धरणीला दुष्काळाचे भयंकर स्वरूप प्राप्त झाले. दुष्काळ ही निसर्गाने मानवाला दिलेले दुखणे नाही तर मानवाने स्वतःहुन ओढवून घेतलेल्या असह्य वेदनेचे कारण बनले. संपूर्ण महाराष्ट्र आज दुष्काळ या समस्येने ग्रासलेले राज्य असताना मुख्यमंत्रयांनी जलयुक्त शिवार अशियान राबवले. आणण त्याचे उत्तम परिणाम आज महाराष्ट्र अनुभवत आहे. 
मानवाच्या शरीरात ७० टक्के भाग व्यापून टाकणारा स्त्रोत म्हणजे पाणी, तेव्हा पुन्हां एकदा पर्यावरण स्नेही बनून आपल्या उद्याची गरज ओळखून सुला विनयार्ड ने काही महत्वपूर्ण उपक्रम राबविले व त्यातून खूप काही गोष्टी साध्य केल्यात. जलयुक्त शिवार अभियान, हे त्यातलेच एक.
 
राज्याच्या काही भागात दर एक दोन वर्षांनी पडणार्‍या दुष्काळावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हि योजना राबवण्याचे तंत्र जोपासले. या जलसंधारणांगर्त सर्वसमावेशक उपाययोजनेद्वारे एकात्मिक पध्दतीने शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिलेले आहे. या अशियानाची प्रमुख उद्दीष्टे अशी की पावसाचे पाणी गावाच्या शिवारात अडविणे, भुगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे, राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करुन शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्य क्षमतेत वाढ करणे, सर्वांना पुरेसें पाणी उपलब्ध करण्याची शाश्वता निर्माण करणे, आस्तित्वात असलेलें व निकामी झालेले बंधारे, गांव, तलाव, पाझर तलाव, सिमेंट बंधारे आदिची साठवण क्षमता वाढविणे यांचा समावेश होतो. अशा कामकाजांची सुरुवात सुलाने मे 2016 ला सुरुवात केली त्यातील बरीच उपक्रम आज पूर्ण झालेली बघायला मिळतात. गंगापुर धरणातून २८८ ट्रक गाळाचा उपसा करून २५ लक्ष लिटर पाण्याची क्षमता वाढवली आहे. सावरगाव येथील पाझर तलावासाठी ६४ लक्ष लिटर पाण्याची क्षमता वाढवली आहे. त्यातुन ६४३ ट्रक इतका वाळूचा उपसा करण्यात आला.
 
गेल्या वर्षी `जलयुक्त शिवार अभियान' योजना निफाड तालुक्यातील महाजनपुर, भेंडाळी, औरंगपूर या गावांत योजली गेली त्यामुळे ३४७ लाख लिलटर पाण्याचे क्षेत्र वाढले. यामुळे वर्षभर पाणी टंचाई पासून बचाव होणे शक्य झाले. तसेच जमीनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढली. याचा फायदा भविष्यात जमिनीचा पोत नियमित ठेवण्यासाठी झाला. मागील वर्षात एकूण १२ लाख रु खर्च करून सुमारे ५०० लाख लिलटर पाण्याचे क्षेत्र वाढले. सुमारें ४३९३ ट्रक इतक्या मोट्या प्रमाणावर गाळाचा उपसा करून जलसंवर्धनाचे काम पार पडले.
 
गेल्यावर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा सुलाने आपल्या सी एस आर उप्रमाअंतर्गत सावरगाव पाझर तलावाच्या गाळाचा उपसा करण्यास सुरुवात केली आहे. नाशिकचे विद्यमान कलेक्टर श्री राधाकृष्णन यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत असलेल्या 'जलयुक्त शिवार योजने'चा 'गाळ उपसा प्रकल्प' हा एक महत्वाचा भाग आहे. आता हा प्रकल्प पूर्णत्वकडे वाटचाल करत असून आत्तापर्यंत ३७७८ क्युबिक मीटर माती काढली गेलेली असून, हा उपक्रम साधारण ११ जून पर्यंत चालू राहणार आहे. याद्वारे ४० लाख लिटर पर्यंत पाणी साठवण क्षमता वाढवली जाईल. पाउस पाण्याच्या सुरुवातीलाच काम पूर्ण होत असल्याने या उपक्रमाचा फायदा सावरगावाला होणार आहे.