मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 9 मार्च 2024 (12:04 IST)

लग्नात नाचताना नवरदेवाच्या भावाच्या मृत्यू

Grooms brother dies while dancing at wedding
काळ कधी आणि कुठे कोणावर झडप टाकेल हे कोणीही सांगू शकत नाही.लग्नामध्ये डीजेवर नाचताना नवरदेवाच्या भावाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उत्तरप्रदेशातील ऐटा येथे घडली आहे. डीजेवर नाचताना नवरदेवाच्या 15 वर्षाच्या भावाचा मृत्यू झाला.सुधीर असे मयत मुलाचे नाव आहे.  घरात लग्नाच्या आनंदाच्या क्षणी शोकाकुल वातावरण झाले. 

सदर घटना उत्तरप्रदेशातील एटा जिल्ह्यातील मुबारीकपूर गावातील आहे .या गावात विशेष सिंग नावाच्या तरुणाचे लग्न होते.घरात डीजे लावण्यात आले होते. रात्री  डीजे वर नाचण्यासाठी नातेवाईकांनी मयत सुधीरला नाचण्यासाठी बोलावले. डान्स करताना तो अचानक जमिनीवर कोसळला.

याआधी कोणाला काहीच कळले नाही मात्र तो बराच वेळ झाला उठलाच नाही तर नातेवाकांनी त्याला रुग्णालयात नेलं तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.सुधीरच्या मृत्यूची बातमी समाजतातच घरात आरडाओरड सुरु झाला. अचानक झालेल्या या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.   
 
Edited by - Priya Dixit