सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 6 ऑगस्ट 2023 (15:58 IST)

धक्कादायक !चोरीच्या संशयावरून लहान मुलांसोबत अमानुषी कृत्य

माणुसकीला लाजवेल असा एक व्हिडिओ यूपीच्या सिद्धार्थनगर जिल्ह्यातून समोर आला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये 2 मुलांना चोरट्यांनी चोरीच्या संशयावरून बेदम मारहाण केली. क्रूरतेची परिसीमा इथेच थांबली नाही. त्यांच्यावर असा क्रूरपणा केला गेला, ज्यामुळे लोक हादरले. एक पीडित मुलगा 15 वर्षांचा तर दुसरा 10 वर्षांचा आहे. 

सदर घटना 4 ऑगस्ट रोजीची पाथरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंकटी चौराहाजवळ असलेल्या अर्शन चिकन शॉपमध्ये घडली. येथे दोन मुलांना पैसे चोरल्याच्या संशयावरून पकडण्यात आले. यानंतर गुंडांनी त्यांच्यासोबत मारहाण केली आणि क्रूरतेचा सर्व मर्यादा ओलांडल्या मुलांना सुक्या मिरच्या खाऊन लघवी प्यायची सक्ती करण्यात आली.  एवढेच नाही तर दोघांचे कपडे काढून त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची टाकण्यात आली. यासोबत हात बांधून इंजेक्शनही देण्यात आले.
 
यावेळी मुलाचे हात बांधले गेले. त्याच्यासोबत घडलेला हा क्रूरपणा कुणीतरी कॅमेऱ्यात कैद करून व्हायरल केला. यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. 

हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या निदर्शनास आला होता. याची चौकशी केल्यानंतर लगेचच तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला. पोलिसांनी 6  आरोपींची ओळख पटवली असून त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी  करून पुढील कार्यवाही केली जाईल. 
 
 
 
Edited by - Priya Dixit