Bihar : तरुणाच्या पोटातून स्टीलचे चमचे काढले
अनेकदा आपण ऐकतो की पोटातून ग्लास निघाला, नाणे निघाले , खीळ निघाले आता बिहारच्या लखीसराय येथे एका 25 वर्षाच्या तरुणाच्या पोटातून दोन चमचे काढल्याचा प्रकार झाला आहे. त्याने हे चमचे कसे गिळले हे आश्चर्याची गोष्ट आहे. त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून पोटातून चमचे काढण्यात आले आहे.
सदर घटना बिहारच्या लखीसरायची आहे. या तरुणाच्या पोटात सतत दुखायचे त्यांनी डॉक्टरांना दाखवले आणि डॉक्टरांनी त्याला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. सोनोग्राफी पाहून डॉक्टरांना देखील धक्काच बसला. या तरुणाच्या पोटात दोन मोठे चमचे होते. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटातून चमचे काढायचे ठरवले.
पाटणातील डॉक्टरांच्या पथकाने एन्डोस्कोपीक पद्धतीने त्याच्या पोटातून दोन मोठे चमचे काढले आहे. तब्बल तीन तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. डॉक्टरांच्या पथकाने यशस्वीरीत्या त्याच्या पोटातून चमचे काढले आहे. सध्या तरुणाची प्रकृती स्थिर आहे.
अखेर हे चमचे तरुणाचा पोटात कसे गेले याचे आश्चर्य डॉक्टरांना होत आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
Edited by - Priya Dixit