बुधवार, 12 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 15 जुलै 2023 (15:55 IST)

गोपालगंज : धक्कादायक!150 मोमो खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू

The youth ate 150 momos after making a bet
मोमोज खाण्याची पैज मित्रांमध्ये लावली आणि मोमोज खाऊन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील ठावे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिहोरवा गावात घडली आहे. विपीन असे या मयत तरुणाचे नाव आहे.  
सिहोरवा गावातील रहिवासी विशुन मांझी यांचा 25 वर्षीय मुलगा विपिन कुमार पासवान हा सिवान जिल्ह्यातील बधरिया पोलीस स्टेशन हद्दीतील ग्यानी मोर येथे मोबाईलचे दुकान चालवायचा.या दरम्यान काही मित्र त्याच्या दुकानावर आले आणि त्यांनी मोमोज खाण्याची पैज लावली. 

काही मित्रांच्या समवेत हा मोमोजच्या दुकानात पोहोचला आणि त्याने तब्बल 150 मोमोज खालले.आणि पैज जिंकली. मोमोज खाऊन झाल्यावर त्याचे मित्र निघाले. नंतर विपिनला काही वेळाने अस्वस्थता जाणवू लागली आणि तो बेशुद्ध झाला. त्याला बेशुद्ध झालेलं पाहून कुटुंबीयांनी त्याला तातडीनं रुग्णालयात नेले मात्र तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विपिनच्या वडिलांनी त्याला विष देऊन मारण्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन करवून कुटुंबियांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit