शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 जून 2023 (11:44 IST)

बिहार : शंकराची भूमिका साकारणाऱ्या तरुणाचा सर्पदंशामुळे मृत्यू

बिहारच्या मधेपुराच्या मुरलीगंज दुर्गस्थान मंदिर परिसरात अष्टयम सुरु होते.गेल्या मंगळवारपासून मधेपुराच्या मुरलीगंज दुर्गस्थान मंदिर परिसरात अष्टयमचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एक तरुण भगवान शंकराची भूमिका साकारत होता. त्याने शंकरासारखी वेशभूषा केली होती. त्याचा गळ्यात साप होता. या विषारीसापाच्या दंशामुळे या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुकेश कुमार असे या मयत तरुणाचे नाव असून तो खुर्द कुमारखंडाचा रहिवासी आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या मधेपुराच्या मुरलीगंज दुर्गस्थान मंदिर परिसरात अष्टयम सुरु होते. अनेक कलाकार मंडपाभोवती फिरून रामधुनी करत होते. त्यापैकी एका तरुणाने शंकराचे रूप धारण करून गळ्यात सापाला गुंडाळले होते. आयोजकांनी सापासोबत सर्पमित्राला ही पाचारण केले होते. सर्पमित्राने विषारी सापाला तरुणाचा गळ्यात घातले. काही वेळा नंतर सापाने त्या तरुणाला दंश केले आणि तो तरुण बेशुद्ध झाला.

आयोजकांनी त्याला शुद्धीत आणायचा प्रयत्न केला नंतर त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं . प्राथमिक उपचार करून त्याला दुसऱ्या रुग्णालयात रेफर केले. मात्र ज्यांनी त्याला रुग्णलयात आणले ते तेथून पसार झाले. नंतर त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची महिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी रुग्णालय गाठले आणि प्रकरणाची चौकशी केली. 
 
Edited by - Priya Dixit