बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 मार्च 2019 (18:42 IST)

पालघर सह गुजरातला ही भूकंपाचे धक्के

डहाणू येथील तलासरी परिसरात पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. या ठिकाणी सर्वाधिक क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली असून, इंडियन मेट्रोलॉजिकल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे धक्के आज जाणवले ते 4.3 मॅग्निट्यूडचे होते. या परिसरात मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असून नोंद होत आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. 
 
फेब्रुवारी सुरुवातीला 16 भूकंपाचे धक्के बसल्यची नोंद आहे. तर त्यातील 6 भूकंपाच्या धक्क्याची क्षमता 3.0 मॅग्निट्यूड इतकी होती. सर्वाधिक 4.1 मॅग्निट्यूड क्षमतेच्या भूकंपाची नोंदही आज झाली. त्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्याच तारखेला या ठिकाणी पुन्हा जोरदार भूकंपाचे धक्के बसले आहेत. शुक्रवारी १२ वाजेनंतर एक वाजेपासून जवळपास सहा मध्यम स्वरुपाचे धक्के नोंदवले गेले आहेत. या नोंदीमध्ये 11 वाजून 14 मिनिटांनी आतापर्यंतचा सर्वाधिक क्षमतेचा 4.3 मॅग्निट्यूडचा भूकंप पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी भागात जाणवला आहे. या भूकंपाच्या नोंदीनुसार, गुजरात राज्यातील उंबरगाव, संजान, वापी तसेच केंद्रशासित प्रदेशातील सेलवासपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे.