Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारताचाच हिस्सा आहे पाकव्याप्त काश्‍मीर

Updated: शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017 (08:27 IST)
 
गेल्या काही दिवसांपासून नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी पाकव्याप्त काश्‍मीरविषयी बेताल वक्तव्य करून वादाला तोंड फोडले होते. फारुख अब्दुल्ला यांच्या या वक्तव्यावर हंसराज अहिर यांनी गुरुवारी प्रत्युत्तर दिले. फारुख अब्दुल्ला यांचे विधान निषेधार्हच आहे. पाकव्याप्त काश्‍मीर हा भारताचाच हिस्सा आहे. मात्र, मागील सरकारमुळे तो भाग पाकिस्तानकडे गेला. आता आम्ही पीओके पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला तरी आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. पीओकेवर भारताचाच हक्क आहे आणि तो परत मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
 
दरम्यान, फारुख अब्दुल्ला यांनी बुधवारी एका सभेत पाकव्याप्त काश्‍मीरबाबत वादग्रस्त विधान केले होते. पाकिस्तानच्या अमलाखाली असलेला पाकव्याप्त काश्‍मीर भारताला घेऊ देण्याइतका पाकिस्तान दुबळा नाही. पीओके पाकिस्तानचाच आहे, असे त्यांनी म्हटले होते. त्यांनी बांगडया घातलेल्या नाहीत. त्यांच्याजवळही अणुबॉम्ब आहे, असेही ते म्हणाले होते. जम्मू-काश्‍मीर हा भारताचा भाग आहे आणि पाकव्याप्त काश्‍मीर हे मात्र पाकिस्तानचेच, असे विधान त्यांनी गेल्या आठवड्यात केले होते. फारुख अब्दुल्ला यांच्या विधानाचा विविध राजकीय पक्षांनी निषेध केला होता.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments