बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 नोव्हेंबर 2017 (16:27 IST)

शरद पवार धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

गडचिरोली दौऱ्याच्या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वतः अपघातग्रस्तांच्या मदतीला धावल्याचं चित्र पाहायला मिळालं. पवारांनी कार अपघातातील जखमींना मदत केली.

नागपूरहून गडचिरोलीला जाताना भिवापूरजवळ एका गाडीला अपघात झालेला होता. अपघाताचं दृश्य पाहून पवारही थबकले आणि त्यांनी स्वत: गाडीतून उतरुन जखमींना मदत केली. अपघातग्रस्त गाडीचा दरवाजा उघडला जात नसल्यामुळे जखमींना बाहेर काढायला त्रास होत होता. तेव्हा स्वतः पवारांनी जखमींना बाहेर काढायला मदत केली. गाडीत अडकलेल्या पाच जणांच्या कुटुंबाला शरद पवारांनी बाहेर पडायला मदत केली.