शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 15 नोव्हेंबर 2017 (16:30 IST)

डेटा हॅकिंगची शक्यता, UC Browser अॅप हटविले

गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेलं UC Browser हे अॅप तेथून हटवण्यात आलं आहे. भारतात सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलेल्या अॅपमध्ये हे अॅप सहाव्या स्थानावर आहे. गेल्या काही दिवसांपासून या ब्राऊजरमुळे काही महत्त्वाची माहिती चोरीला जात असल्यामुळे हे अॅप प्लेस्टोअरमधून काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

या ब्राऊजरमधून भारतीयांची महत्त्वाची माहिती चोरीला जात असून ती माहिती चीनमधल्या सर्व्हरला पाठवली जात आहे. डेटा हॅक होण्याच्या तक्रारी वारंवार यात असल्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली. आणि अखेर डेटा हॅकिंग आणि सुरक्षेच्या कारणावरून हे अॅप काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अॅनरॉईड फोनयुजर्संना हे अॅप उपलब्ध होणार नाही. पण अॅपल स्टोअरवर मात्र हे अॅप अजूनही उपलब्ध आहे. चीनची प्रसिद्ध कंपनी अलीबाबाचे हे ब्राऊजर आहे. जगभरातून सुमारे ५० कोटींहून अधिक लोकांनी हे ब्राऊजर डाऊनलोड केले आहे.