शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 22 मे 2017 (11:30 IST)

पंतप्रधान मोदी यांच्या यात्रेअगोदर हार्दिक पटेलाने केले मुंडन, काढला विरोध मार्च

हार्दिक पटेल समेत 51 पाटीदार युवांनी मुंडन करून न्याय यात्रा प्रारंभ केली. हार्दिक पटेलचा आरोप आहे की पाटीदार युवांवर 2015च्या आंदोलनादरम्यान झालेल्या अत्याचाराची चाचणीसाठी सरकार सक्रिय नाही आहे. तसेच भावनगराचे मांडवी हत्याकांड आणि इतर घटनांमध्ये देखील तपास योग्य दिशेत होत नाही आहे. अशात दुसर्‍यांदा राज्यात पाटीदार आंदोलनाला गती देण्याच्या प्रयत्नात त्यांनी न्याय यात्रा काढली आहे. 
 
याच वर्षी गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. अशा वातावरणात पाटीदार आंदोलनावर सर्वांची नजर आहे आणि पाटीदार देखील निवडणुकीच्या वेळेस आपल्या मागण्यांना घेऊन सरकारवर दबाव टाकण्याचे प्रयत्न करीत आहे.  
 
हार्दिक आणि त्यांचे पाटीदार अनामत आंदोलन समिती (पास)जवळ 50 सदस्यांनी आज सकाळी लाठीडाड गांवात विरोध मार्च काढला. त्यानंतर ते तेथून किमान 155 किलोमीटर दूर बोटाड जिल्ह्यातून 'न्याय यात्रा' वर निघाले ज्याने आरक्षणासाठी ओबीसी श्रेणीत सामील करून आपल्या इतर मागण्यांना रेखांकित करू शकतील.  
 
हार्दिकने म्हटले, "जवळच्या 50 सदस्यांसोबत मी या सरकार द्वारे आमच्या समुदायाच्या सदस्यांवर मागील दोन वर्षांमध्ये झालेल्या  अत्याचाराला उघडकीस करण्यासाठी आपले मुंडन करण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही न्याय मागण्यासाठी न्याय या‍त्रेवर निघत आहोत."   
 
महत्त्वाचे म्हणजे हार्दिक पटेलावर कधी आम आदमी पक्षाशी जुळण्याचा आरोप होता आता तो शिवसेनेशी जुळला आहे.