शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. हरियाणा विधानसभा चुनाव 2024
Written By
Last Updated : गुरूवार, 12 सप्टेंबर 2024 (16:46 IST)

Haryana Assembly Election: भाजपने केली 21 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

सध्या हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 21 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीतून शिक्षण मंत्री सीमा त्रिखा आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री बनवारी लाल यांची तिकिटे रद्द करण्यात आली आहे. जुलाना येथे कॅप्टन योगेश बैरागी यांना काँग्रेस उमेदवार विनेश फगट यांच्या विरोधात तिकीट देण्यात आले आहे.

विनेश फोगट यांना जुलना विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. 8 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. नामांकनाची अंतिम तारीख 12सप्टेंबर आहे.

पक्षाकडून नारायणगडमधून पवन सैनी, पुंद्रीतून सतपाल जांबा, असंधमधून योगेंद्र राणा, गन्नैरमधून देवेंद्र कैशिक, रायमधून कृष्णा गेहलावत, बरैदामधून प्रदीप सांगवान, नरवानामधून कृष्णकुमार बेदी, डबवलीतून बलदेव सिंग मंगियाना, अमीर चंद हे उमेदवार आहेत.

एलेनाबाद मेहता, रोहतकमधून मनीष ग्रोवर, नरनेलमधून ओम प्रकाश यादव, बावलमधून कृष्णा कुमार, पटाईधीमधून बिमला चौधरी, नूहमधून संजय सिंग, फिरोजपूर झिरकामधून नसीम अहमद, पुन्हानमधून एजाज खान, हातीनमधून मनोज रावत, हरिंदर सिंग रामरतन. होडल, धनेश आधलाखा यांना बदखलमधून तिकीट देण्यात आले आहे.

पक्षाने फिरोजपूर झिरका विधानसभा मतदार संघातून नसीम अहमद आणि पुन्हाना विधानसभा मतदारसंघातून एजाज खान यांना तिकीट देण्यात आले आहे. 
Edited by - Priya Dixit