1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated: रविवार, 29 जानेवारी 2023 (15:17 IST)

या राज्याच्या आरोग्यमंत्र्यांवर गोळी झाडून प्राणघातक हल्ला, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगरजवळ हल्ला झाला आहे. गांधी चौकाजवळ काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा नाबा दास त्यांच्या कारमधून बाहेर पडले तेव्हा अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. मात्र, त्यांच्यावर गोळीबार का करण्यात आला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेनंतर नबा दास यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
 
घटनास्थळी तणाव वाढला आहे. नाबा दास यांच्यावरील हा हल्ला पूर्वनियोजित होता, कारण मंत्र्यावर जवळून गोळ्या झाडण्यात आल्याचे मानले जात आहे. या घटनेने सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत कारण नबा दास यांना पोलिस संरक्षणही देण्यात आले होते. 
 
Edited By - Priya Dixit