शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 जुलै 2021 (20:02 IST)

जगातील अनेक देशात उकाड्यासह उष्णतेची लाट

जगातील अनेक देशात देशांमध्ये हवामानात मोठे बदल झाल्यामुळे तापमानात प्रचंड वाढ होऊन उष्णतेची लाट पसरली आहे.या मध्ये केनेडा,उत्तर आफ्रिका अरबी,द्वीप,सह वायव्य भारतातील उपखंडच्या काही भागात तापमानात वाढ झाली आहे.देशाची राजधानी दिल्लीचे सर्वात उष्ण तापमान होते. राजधानीतील उष्णता दररोज नवीन विक्रम करीत होती. गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हामुळे सर्वजण त्रस्त झाले होते. दिल्ली-एनसी आर मधून मान्सूनही रुसला आहे. जूनमध्ये, हवामान खात्याने 15 जूनपर्यंत दिल्ली-एनसीआरमध्ये मान्सून येण्याची शक्यता वर्तविली होती, 15 जूनपर्यंत भौगोलिक परिस्थितीमुळे हा अंदाज चुकीचा असल्याचे सिद्ध झाले. जुलैचा पहिला दिवस गेल्या 89 वर्षातील सर्वात उष्ण दिवस होता 
 
1931 नंतर प्रथमच जास्तीत जास्त तापमान 43.6 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचला.याच बरोबर, किमान तापमान देखील गेल्या दशकात सर्वाधिक 31.7 अंश सेल्सिअस होते. दुसरीकडे, दिल्लीच्या लोकांनी सलग तिसर्‍या दिवशीही उष्णता सहन केली. 
 
हवामान खात्याने आणखी एक अंदाज वर्तविला होता की दिल्ली-एनसीआरमध्ये जुलैच्या सुरूवातीस चांगला पाऊस पडेल, परंतु जुलैच्या पहिल्या दिवशी झालेल्या उन्हाने 89 वर्षांचा विक्रम मोडला. पण जुलैच्या दुसर्‍या दिवशी दिल्लीच्या अनेक भागात मुसळधार पावसाने जनतेला दिलासा दिला.