1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 22 मे 2025 (09:32 IST)

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये भीषण चकमक, सुरक्षा दलांनी जैशच्या ३-४ दहशतवाद्यांना घेरले

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडमध्ये सुरक्षा दलांनी जैशच्या ३-४ दहशतवाद्यांना घेरले आहे. सुरक्षा दलांची संयुक्त कारवाई अजूनही सुरूच आहे, गोळीबार झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
मिळालेल्या माहितनुसार जम्मू आणि काश्मीरमधून दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी भारतीय सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरूच आहे. सुरक्षा दल एकामागून एक ऑपरेशन राबवून दहशतवाद्यांचा खात्मा करत आहे. त्याच क्रमाने, गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील सिंगपोरा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांनी या भागात ३-४ जैश दहशतवाद्यांना घेरले आहे. अशी माहिती सामोर आली आहे.
तसेच जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवार जिल्ह्यातील चतरू सेक्टरमधील सिंगपोरा भागात गुरुवारी पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत तीन ते चार दहशतवाद्यांना घेरण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या अचूक माहितीच्या आधारे जम्मू आणि काश्मीर पोलिस, भारतीय लष्कर आणि निमलष्करी दलांच्या संयुक्त पथकाने घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली तेव्हा ही चकमक सुरू झाली.