शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 13 जानेवारी 2018 (15:06 IST)

बेपत्ता हेलिकॉप्टर समुद्रात कोसळलं, तीन जणांचा मृत्यू

ओएनजीसीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे अवशेष डहाणूजवळच्या समुद्रात सापडले आहेत. हेलिकॉप्टरमधील सात जणांचा शोध सुरु आहे. ओएनजीसीच्या डाऊफिन एएस 365 एन3 या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला होता. या हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिकांसह ओएनजीसीचे पाच कर्मचारी प्रवास करत होते.
 
ह्या हेलिकॉप्टरने सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी जुहू इथून उड्डाण केलं होतं. हेलिकॉप्टर सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी ओएनजीसीच्या समुद्रातील लॉन्चपॅडवर पोहोचणं अपेक्षित होतं. परंतु समुद्रात 30 नॉटिकल मैल अंतरावर असताना, सकाळी 10.35 वाजता हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला.
 
दरम्यान तटरक्षक दलाने शोध मोहिम हाती घेतली. तर नौदलाच्या काही बोटी आणि विमानं डायव्हर्ट करुन हेलिकॉप्टरचा शोध सुरु घेत होते. याशिवाय एअर ट्रॅफिक कंट्रोल सातत्याने हेलिकॉप्टरशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतं. अखेर डहाणूजवळ हेलिकॉप्टरचे अवशेष समुद्रात आढळले.