उत्तराखंडमध्ये बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर कोसळले, वैमानिकासह सहा जणांचा मृत्यू
उत्तराखंडमध्ये आणखी एक मोठा विमान अपघात झाला आहे. बद्रीनाथ धामहून डेहराडूनमधील सहस्रधाराकडे सहा प्रवाशांना घेऊन जाणारे उकाडाचे हेलिकॉप्टर जोशीमठजवळ कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात वैमानिक आणि इतर सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
हेलिकॉप्टरमधील सर्व सहा जणांचा अपघातात मृत्यू झाला. लष्कर घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी बचाव कार्याची सूत्रेही हाती घेतली आहेत, असे सांगण्यात आले आहे. अद्ययावत माहितीनुसार, हेलिकॉप्टरचे वैमानिक कॅप्टन हिमांशू होते. प्रवाशांची ओळख प्रताप, अरुण, शंकर गौडा, सुधीर के आणि एच.एस. नटराज अशी पटली आहे. अरुण हे बंगळूर पोलीस गुन्हे शाखेत निरीक्षक असल्याचे सांगण्यात येत आहे.
हा अपघात बद्रीनाथ आणि जोशीमठजवळील पांडुकेश्वर येथील भेद गडेरा टेकडीवर झाला. हे हेलिकॉप्टर ट्रान्स भारत कंपनीचे होते आणि त्यात एक वैमानिक व पाच प्रवासी होते. सर्व प्रवासी बंगळूरचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, मेसर्स ट्रान्स भारत एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडच्या सर्व हेलिकॉप्टरचे उड्डाण थांबवण्यात आले आहे.
