बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (10:21 IST)

मालेगावमध्ये 'हिजाब डे'

कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या हिजाब वादाचे पडसाद राज्यातही उमटत आहेत. मालेगावमध्ये आज हिजाबच्या समर्थनात हिजाब दिवस साजरा करण्यात येणार आहे.
 
कर्नाटकातून सुरू झालेल्या हिजाब प्रकरण वाढत असून वादाचे पडसाद राज्यातही उमटत आहेत. मालेगावमध्ये आज हिजाबच्या समर्थनात हिजाब दिवस साजरा करण्यात येणार आहे. हिजाब दिनानिमित्त हिजाब परिधान करूनच घराबाहेर पडण्याचा निर्णय या महिलांनी जाहीर केलाय. 
 
शुक्रवारी मालेगावमध्ये 'हिजाब दिन' पाळण्यात येणार असून सर्व महिला त्या दिवशी बुरखा परिधान करतील अशी माहिती  इरफान नदवी या मौलनांनी यांनी दिली. हिजाब हा मुस्लिम समाजात ईबादत म्हणून पाहिले जाते. अशात हिजाब काढण्यासाठी बळजबरी करणे किंवा बंधन घालणे चुकीचे असल्याचं मत मौलनांनी व्यक्त केले आहे. 
 
काही मुस्लिम संघटनांनी हिजाबच्या समर्थनार्थ आंदोलनही केले. गुरुवारी झालेल्या आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच आजच्या म्हणजेच शु्क्रवारच्या ‘हिजाब डे’ला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
 
दुसरीकडे जालन्यातही गुरुवारी मुस्लिम महिलांनी हिजाबच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली. या मोर्चात शेकडो मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या. कर्नाटकात एका शैक्षणिक संस्थेकडून मुस्लीम मुलींच्या हिजाबवर बंदी घालण्यात आली. याचा निषेध करण्यासाठी बुलढाणा येथे देखील मोर्चा, निदर्शने आणि आंदोलनाची शक्यता आहे.