मंगळवार, 1 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 मार्च 2025 (12:24 IST)

पतीने पत्नीचे लग्न प्रियकरासोबत लावून दिले, मुलांचा सांभाळ मी करेन म्हणाला

मेरठ आणि औरेयाच्या घटनेची दहशत सध्या सर्वत्र पसरली आहे.त्यावरून घाबरून उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्यातील धनघाटा पोलीस स्टेशन परिसरात पतीने आपल्या पत्नीचे लग्न तिच्या प्रियकराशी लावून देण्याची घटना घडली आहे. पतीने त्याच्या पत्नीसह कोर्टातून करार करून घेतले आणि नंतर पत्नीचे लग्न तिच्या प्रियकरासह मंदिरात लावून दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे लग्न 2017 मध्ये झाले होते. लग्नानंतर महिलेला दोन मुलेही झाली. दरम्यान, ती महिला गावातील एका तरुणाच्या प्रेमात पडली आणि हे नाते हळूहळू गावात चर्चेचा विषय बनले. महिलेच्या पतीला हे कळल्यावर  त्याने प्रथम तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण समझवण्याचा काहीच उपयोग झाला नाही. महिले ने पतीला प्रियकरासोबत राहण्याची इच्छा ऊत्त्त केली. तेव्हा त्याने आपल्या पत्नीचे लग्न पत्नीच्या प्रियकराशी लावण्याचा निर्णय घेतला. 
धनघाटा पोलीस स्टेशन परिसरातील कटार जोत गावातील बबलूचा विवाह 2017मध्ये गोरखपूर जिल्ह्यातील बेल घाट पोलीस स्टेशन परिसरातील भुलांचक गावातील रहिवासी राधिकाशी झाला होता. दोघेही पती-पत्नी आनंदाने आपले जीवन जगत होते. त्यांच्या आठ वर्षांच्या लग्नात त्यांना दोन मुलेही झाली.पहिले मूल सात वर्षांचा मुलगा आणि दुसरे मुलगी होते. ती दोन वर्षांची आहे.
बबलू अनेकदा उदरनिर्वाहासाठी घराबाहेर राहायचा. दरम्यान, राधिका गावातील एका तरुणाच्या प्रेमात पडली.आणि नंतर गावात चर्चा सुरु झाली.पतीने पत्नीला प्रियकराला भेटू नको.असे समजावून सांगितले तरीही तिने ऐकले नाही. 

सौरभ प्रमाणेच तिने माझी हत्या केली तर अशी भीती त्याला सतावत होती. त्या भीतीपोटी त्याने पत्नीचे लग्न प्रियकराशी लावून देण्याचे ठरवले आणि तसे केले.आणि दोन्ही मुलांचा सांभाळ मी करेन असे सांगितले.  
Edited By - Priya Dixit