रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पत्नीची हत्या करून 24 तास मृतदेहाजवळ बसला पती

दिल्ली- कमला मार्केट भागात एका इसमाने आपल्या पत्नीचा गळा दाबून हत्या केली. नंतर दोन वर्षाच्या मासूम मुलीसोबत पत्नीच्या देहाजवळ 24 तास बसला राहिला. शनिवारी रात्री सुमारे दीड वाजता त्याने ठाण्यात जाऊन सरेंडर केलं.
 
पोलिस आरोपीच्या घरी पोहचली तर तेथे जमिनीवर बिछान्यावर पत्नीचा मृतदेह सापडला. आरोपी कामिल (25) विरुद्ध खून आणि हुंडा प्रकरणात नोंदवत अटक करण्यात आली आहे. मुलीला तिच्या आजीकडे सोपवण्यात आले आहे. चौकशीत कळले की कामिलने अनैतिक संबंध असल्याच्या संशय असल्यामुळे पत्नी रेशमा (23) चा खून केला. कामिल कुटुंबासह 159, शकूर की डंडी, मिंटो रोड येथे दुसर्‍या मजलावर भाड्याच्या घरात राहत होता.
 
सुमारे तीन वर्षापूर्वी त्याने रेशमासोबत प्रेम विवाह केले होते. दोघांची दोन वर्षाची मुलगी आहे. कामिल आंबेडकर कॉलेजमध्ये चपराशी आहे. त्याचा पत्नीवर दोन इतर कुणा व्यक्तींशी संबंध असल्याचा संशय होता. त्याने पत्नीला समजावले तरी तिने दुर्लक्ष केल्यामुळे याने असे पाऊल उचलले.