गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (14:33 IST)

पतीने सुई- दोर्‍याने पत्नीचा प्रायव्हेट पार्ट शिवला

मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यात एक अत्यंत लज्जास्पद प्रकरण समोर आले आहे. असा आरोप आहे की, एका पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तिचा प्रायव्हेट पार्ट सुई- धाग्याने शिवला. आरोपी पती सध्या फरार आहे.
 
अहवालानुसार, ही कथित घटना जिल्ह्यातील माडा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथील एका महिलेने तक्रार केली की तिचा पती तिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. पती असा आरोप करायचा की महिलेचे पुरुषाशी संबंध आहेत. एवढेच नव्हे तर पती संशयाच्या भोवऱ्यात इतका आंधळा झाला होता की त्याने सुईदोर्‍याने तिचा प्रायव्हेट पार्ट शिवला होता.
 
या प्रकरणात तक्रारीनंतर आरोपींविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांप्रमाणे जर आरोप खरे असतील तर तो खूप अमानुष गुन्हा आहे आणि स्त्रीने खूप वेदना सहन केल्या आहेत. महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.