शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

आयसीएसई आणि आयएससी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

भारतीय निवडणुक आयोगातर्फे पंजाब, गोवा, मणीपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश राज्यात जाहीर केलेल्या  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशतर्फे देशभरात घेण्यात येणाऱ्या आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी) बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोर्डातर्फे जाहीर करण्यात आले.

सुधारित वेळापत्रकानुसार आयसीएसई बोर्डाची परीक्षा १० मार्चपासून तर आयएससी बोर्डाची परीक्षा ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. बोर्डाच्या संकेतस्थळावर  नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून त्याची  दखल विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी  घेण्यात यावे असे आवाहन यावेळी बोर्डाने केले. यंदाच्या या परीक्षेला आयसीएसई बोर्डासाठी १ लाख ७६ हजार ३२७ आणि आयएससी परीक्षेसाठी ७४ हजार ५४४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.