गुजरात मध्ये आकाशातून गोळासारखी अज्ञात वस्तू पडली
गुजरातच्या आकाशातून गोळासारखी अज्ञात वस्तू पडलीआहे. हे पाहताच लोकांमध्ये घबराट पसरली. ही बाब तत्काळ स्थानिक पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून लोकांची गर्दी हटवली.यानंतर एफएसएल टीमला पाचारण करण्यात आले .सध्या तपास सुरूच आहे. सध्या अज्ञात वस्तू हा उपग्रहाचा भाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गुजरातमधील उमरेठ तहसील परिसरात आकाशातून गोळासारखी काही अज्ञात वस्तू पडली आहे. लोकांनी पाहिल्यावर सर्वत्र बातमी पसरली. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. लोकांनी याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून माहिती घेतली. पोलिसांनी लोकांना त्या गोलाकार वस्तूपासून दूर नेले. पोलिसांनी एफएसएल टीमला पाचारण केले. एफएसएल पथक तपास करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमरेठ तहसील परिसरातील खानकुवा गावाजवळ आकाशातून एक अज्ञात वस्तू पडली. ती दिसायला गोलासारखी वस्तू आहे.गोळाकार वस्तूमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी लोकांना तेथून बाजूस केले. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. सध्या गोलासारखी वस्तू उपग्रहाचा भाग असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
ही घटना संध्याकाळी 4 ते 5 वाजे च्या दरम्यानची आहे. पोलिसांनी एफएसएलच्या पथकालाही घटनास्थळी तपासासाठी पाचारण केले. पथक तपास करत आहे.
या पूर्वी 2 एप्रिल 2022 रोजी संध्याकाळी महाराष्ट्रातील चंद्रपुरात आकाशातून आगीचे गोळे पडले होते.उल्कासारखे आगीचे गोळे आकाशातून वेगाने जमिनीकडे येताना दिसले. हे दृश्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून पाहायला मिळाले.